GST on food items : आजपासून 'जगणं' महागणार, 'या' जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी
आजपासून सर्वसामान्यांचं जगणं महागणार आहे. गॅस सिलिंडरच्या आडून स्वयंपाकघरात भडकलेली महागाई आता जीएसटीच्या रूपात सर्वसामान्यांना रडवणार आहे. सरकारी तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत करमुक्त राहिलेल्या अनेक जीवनावश्यक वस्तूंना जीएसटीच्या कक्षेत आणलंय. त्यामुळे आजपासून पॅकिंग केलेलं धान्य, दही, लस्सी, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. यावर ५ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपचारही आजपासून महाग होणार आहेत. रुग्णालयाने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करून दिल्यास त्या खोलीवर ५ टक्के दराने जीएसटी द्यावा यापुढे लागेल. तर हॉटेलच्या रूमभाडय़ावर 12 टक्के तर एलईडी लाईट्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. महागाईचे दररोज चटके बसू लागल्यामुळे आता जगायचे कसे? असा प्रश्न देशातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.