Rahul Gandhi :आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांसह नुकसान भरपाई द्यावी
नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधात (farmer law) गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या ( farmers ) नातेवाईकांना केंद्राकडून नुकसानभरपाई आणि नोकऱ्या ( jobs) देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandh) यांनी केली आहे. मंगळवारी लोकसभेत केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी ही मागणी केली.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी मांडण्यात असमर्थता दर्शविल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर टीका केली. शिवाय पंजाब आणि हरिणातील मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मिळालेली नुकसानभरपाई आणि नोकऱ्यांची यादी लोकसभेत सादर केली. यावेळी काँग्रेस सदस्यांनी या मुद्यावर सरकारला निवेदन देण्याची मागणी केली. तर सरकारविरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.