Gail Omvedt : समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांचं निधन
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या डॉक्टर गेल ऑम्वेट यांचं आज सातारा जिल्ह्यातल्या कासेगावमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. अमेरिकेत जन्मलेल्या गेल ऑम्वेट चळवळींचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रात आल्या आणि नंतर चळवळींचा अभ्यास करताना त्यांनी महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. पुढे पूर्णवेळ चळवळीत काम करणारे डॉ. भारत पाटणकर यांना जीवनसाथी म्हणून निवडलं. बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स आणि स्त्रीमुक्तीवादी विचारांची तसेच संतसाहित्य, वारकरी तत्त्वज्ञानाची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. डॉक्टर गेल ऑम्वेट यांनी स्त्री-मुक्ती चळवळ, परित्यक्ता महिलांची चळवळ आणि आदिवासी चळवळीमध्ये पायाला भिंगरी लावून काम केलं.























