(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi addresses soldiers | आव्हान दिल्यास सडेतोड उत्तर देऊ, पंतप्रधानांचा चीन-पाकला इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी त्यांची दिवाळी राजस्थानच्या लोंगेवाला येथील जवानांसोबत साजरी केली. त्यांनी भारताच्या शूर जवानांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना सांगितले की, "तुम्ही भले बर्फाळ प्रदेशात राहा वा वाळवंटी प्रदेशात, माझी दिवाळी तुमच्यासोबतच आल्यानंतरच पूर्ण होते."
यावेळी पंतप्रधानांनी 1971 साली पाकिस्तानसोबत लढल्या गेलेल्या लोंगेवालाच्या ऐतिहासिक युद्धाची आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, "भारतीय जवानांनी लोंगेवाला इथे इतिहास रचला होता. या लढाईने स्पष्ट केले की भारतीय सैन्यासमोर कोणतीही शक्ती तग धरु शकत नाही."
ते पुढे म्हणाले की, 'आजचा भारत समजण्यावर आणि समजावण्यावर भर देतो. आजचा भारत शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता ठेवतो. भारताला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या घरात घुसून मारण्याची क्षमता जवानांकडे आहे."