एक्स्प्लोर
Maharashtra Chitrarath | प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नाही | ABP Majha
राजधानी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. दरवेळी रोटेशन पद्धतीनुसार काही राज्यांना संधी मिळते. 2016 साली सुद्धा राजपथावरच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता, त्यानंतर तीन वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. राजपथावरचं हे संचलन ठराविक वेळेतच पूर्ण व्हावं लागतं, त्यामुळे दरवर्षी ठराविक राज्यांनाच यात संधी मिळते. यावेळी 16 राज्यं आणि 6 केंद्रीय मंत्रालये अशा एकूण 22 चित्ररथांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राकडून रंगभूमीच्या 175 वर्षांच्या प्रवासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव होता. पण तो केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजूर झालेला नाही.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
कोल्हापूर
Advertisement
Advertisement




















