एक्स्प्लोर
Dattatreya Hosabale RSS : धर्मांतर आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचं असंतुलन ABP Majha
देशात धर्मांतर आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचं असंतुलन निर्माण होत असल्याचं आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलंय. त्यामुळे धर्मांतरविरोधी कायद्याची सक्ती करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. धर्मांतर रोखण्यासाठी कायदे बनवले गेले आहेत, पण त्यांची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचं होसबळे यांनी म्हटलंय. याशिवाय घरवापसीचे चांगले परिणाम समोर आल्याचंही होसबळे यांनी सांगितलं. धर्मांतर केलेल्यांना आरक्षणाची सुविधा मिळू नये अशी संघाची आधीपासून भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय.
आणखी पाहा























