एक्स्प्लोर
COVID-19 Vaccination : देशात काल एका दिवसात 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण : ABP Majha
कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी आहे. देशात कोरोनावरील लसीकरण सुरु झाल्यानंतर काल प्रथमच एका दिवसात १ कोटीपेक्षा अधिक लोकांना लस देऊन आजवरचा उच्चांक गाठला गेला. हा आकडा स्वित्झर्लंडच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. लसीकरणातील या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. देशभऱातील ६३ हजार केंद्रावर रोज एक कोटीपेक्षा अधिक लशी देण्यास आपली यंत्रणा सक्षम असल्याचं एनटीएजीआयचे प्रमुख डॉक्टर एन के अरोरा यांनी सांगितलं. भारतात आतापर्यंत ६२ कोटी १७ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आलीय.
आणखी पाहा























