एक्स्प्लोर
CBSE 2021 Exam Dates : सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, चार मे पासून परीक्षा सुरु होणार
सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा चार मे पासून घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी थेट सत्रादरम्यान स्पष्ट केले. परीक्षा 10 जूनपर्यंत चालतील. 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.
शिक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की ते सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा 31 डिसेंबर 2020 रोजी म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी करतील. त्यांच्या सूचनेनुसार अखेर शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली. यंदाची सीबीएसई बोर्डाची परीक्षा मे ते जून महिन्यादरम्यान होणार आहेत.
परीक्षेच्या तारखांच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिक्षणमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. याआधीही, ते बर्याचदा लाईव्ह आले आहेत आणि प्रत्येक वेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. शेवटी, त्यांनी या कामासाठी वर्षाचा शेवटचा दिवस निश्चित केला.

आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
कोल्हापूर
Advertisement
Advertisement