Babri verdict | जादूने बाबरी मशीद गायब केली होती का? कोर्टाच्या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसींचा सवाल
बाबरी विध्वंस प्रकरणी कोर्टाच्या निर्णयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओवैसी यांनी एक शायरी ट्वीट करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवर ट्वीट केलं की, 'वही कातिल वही मुनसिफ अदालत उसकी वो शाहिद, बहुत से फैसलों में अब तरफदारी भी होती है.'
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, 'सीबीआय कोर्टाचा निर्णय म्हणजे, भारतीय न्यायालयाच्या तारखेचा काळा दिवस आहे. जादूने मशीद गायब केली होती का? जादू करून मुर्ती ठेवल्या होत्या का? जादूने टाळे उघडण्यात आले? सुप्रीम कोर्टाने जो 9 नोव्हेंबर रोजी निर्णय दिला होता, आजचा निर्णय त्याविरोधात आहे. तुम्ही अंदाज लावा अडवाणींची रथयात्रा जिथे-जिथे गेली, तिथे-तिथे हिंसा झाली. लोकांची घरं जाळण्यात आली.' तसेच ते म्हणाले की, 'काय हे खरं नाही का? की उमा भारती म्हणाल्या होत्या की, एक धक्का आणखी द्या, बाबरी मशीद तोडा. काय जेव्हा बाबरी विध्वंस झाला त्यावेळी उमा भारती, अडवाणी मिठाई खात नव्हते?'