एक्स्प्लोर

Bangladesh Sheikh Hasina : लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वात ढाक्यात हायव्होल्टेज बैठक

Bangladesh Sheikh Hasina : लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वात ढाक्यात हायव्होल्टेज बैठक    

 बांगलादेशात (Bangladesh News) सध्या प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. आरक्षणाबाबतचं आंदोलन चिघळलं, त्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. पुढे आंदोलन एवढं चिघळलं की, शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देऊन काही वेळातच शेख हसीना यांनी देश सोडून पलायन केलं. सध्या शेख हसीना कुठे आहेत? त्यांना कुणी आश्रय दिलाय? याबाबत कोणाला, काहीच माहिती नाही.   बांगलादेशात आरक्षणावरून झालेल्या हिंसाचार आणि विरोधानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. सरकार पडल्यानंतर हसीना भारतात आल्या. मात्र, त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. जोपर्यंत हसीना यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळत नाही, तोपर्यंत शेख हसीना भारतातच राहणार आहेत. सोमवारी त्यांचं सरकार पडल्यानंतर भारत सरकारनं त्यांना अंतरिम स्थलांतराची परवानगी दिली आहे. मात्र, अशा संकटातून वाचण्यासाठी शेख हसीना भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता.   कुटुंबाच्या हत्येनंतर बचावलेल्या शेख हसीना भारतात आश्रयाला शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार झाल्या, त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि भारतानं मदत देऊ केलीही. पण यापूर्वीही संकटकाळी भारत शेख हसीना यांच्या मदतीसाठी पुढे आला होता. यापूर्वी 1975 मध्ये शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर त्या तब्बल 6 वर्षे दिल्लीत राहिल्या होत्या. 15 ऑगस्ट 1975 रोजी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या घरी हत्या करण्यात आली. त्या दिवशी शेख हसीना यांच्या कुटुंबातील 17 जणांची हत्या करण्यात आली होती. मात्र, शेख हसीना आणि त्यांची बहीण त्यावेळी जर्मनीत असल्यानं त्यांचा जीव वाचला होता.

भारत व्हिडीओ

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget