Shraddhav Walkar Case : अफताबचं आणखी एक 18 ऑक्टोबरचं सीसीटीव्ही समोर
देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट आज होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील रोहिणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ही नार्कोे टेस्ट होऊ शकते आणि त्यासाठी प्रश्नावलीच तपास अधिकाऱ्यांनी तयार केलीय. वसईतील तरुणी श्रद्धा वालकर हिच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिचा प्रियकर आफताब पूनावाला यानं दिल्लीतल्या घरी निर्घृण हत्या केली होती. दिल्लीतल्या छतरपूर भागातील जंगलात त्यानं हे तुकडे फेकून दिले होते. या जंगलात पोलिसांना एका कवटीचा काही भाग आणि हाडं सापडले. हे अवशेष आता डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात येणार असून त्यात ते श्रद्धाचे आहेत का हे स्पष्ट होणार आहे. आरोपी आफताब श्रद्धाचा इतका तिरस्कार करत होता की त्यानं तिच्याशी संबंधित प्रत्येक वस्तू दूर केली आणि २३ मे रोजी तिचा फोटोही जाळला.






















