Deep Sidhu Death : लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू ABP Majha
पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धूचा काल रात्री अपघाती मृत्यू झालाय. २६ जानेवारी २०२१ ला लाल किल्ल्यावर शीखांचा धार्मिक ध्वज फडकावल्याच्या प्रकरणानंतर दीप सिद्ध चर्चेत आला होता. काल कुंडली-मानेसर-पालवाल द्रुतगती मार्गावर त्याच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला खारखोडा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान त्याच्यासोबत वाहनामध्ये असलेली त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री रिना राय बचावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दीप सिद्धूला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. याबाबत त्याने तक्रारही केली होती. त्यामुळेच हा अपघात की घातपात याचा तपास पोलीस करतायत.























