Rain Update : अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ,शेतकरी हवालदिल ABP Majha
कोकणात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर गळून गेलाय. याबाबत आंबा उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाला बागायतदारांना मुकावे लागले आहे. त्या झाडांना पुन्हा जानेवारी महिन्यात मोहोर येईल. सध्या थंडीलाही विलंब झाला. तसेच किमान तापमान मोहोर फुटीला आवश्यक एवढे नाही. त्यामुळे वातावरणातील बदलांचा आंबा हंगामावर परिणाम झाला आहे. आंबा हंगाम हा सर्वसाधारण 100 ते 110 दिवसांचा असतो. मात्र यंदा बदलत्या वातावरणाचा परिणाम झाल्यामुळे 60 ते 70 दिवसांचा हंगाम राहण्याची शक्यता आहे.
30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावआणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो.