Dharashiv Medical College : धाराशिव शासकीय वैद्यकीय कॉलेजचा तळघरात पाणी, औषधांचा साठा भिजला
Dharashiv Medical College : धाराशिव शासकीय वैद्यकीय कॉलेजचा तळघरात पाणी, औषधांचा साठा भिजला
धाराशिवमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरातील लाखो रुपयांचा औषधांचा साठा पावासाच्या पाण्याने भिजला असून मोठं नुकसान झालंय. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार समोर आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये किंमतीच्या गोळ्या आणि औषधांचं नुकसान झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सखोल चौकशी करुन दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली जात आहे
कॉलेजच्या तळघरात पाणी, औषधांचा साठा भिजला
शासकीय मेडिकल कॉलेजच्या तळघरात पाणी शिरल्याने लाखों रुपयांच्या औषध, गोळ्याचे मोठे नुकसान, प्रशासनाचं दुर्लक्ष..... दोन दिवस झालेल्या पावसामुळे तळघरात पाणी साचल्याने औषधांचा साठा भिझला... जिल्हाधिकारी यांनी तात्काळ भेट देऊन सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व गुत्तेदरावर कारवाई करण्याची मागणी......