एक्स्प्लोर
Chhatrapati sambhaji Nagar Water Shortage : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई
छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवतेय. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते दोन किमी पर्यंत पायपीट करावी लागतेय. जीवघेणी कसरत करत खोल विहिरीतून पाणी भरावं लागतंय.. लहान मुलं, वृद्ध महिलाही जीवावर उधार होवून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करतायत..एरवी पाण्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगावात यंदा मात्र दुष्काळाची स्थिती निर्माण झालीये. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे.. मात्र कुणालाच या पाणीसंकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय
आणखी पाहा























