Prakash Mahajan : काय धमकी देताय? मी राज ठाकरेंचा समर्थक; प्रकाश महाजनांचा राणेंचा इशारा
Prakash Mahajan on Narayan Rane : मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाजन यांना धमकीवजा इशारा दिला. "पुन्हा आमच्याविरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन," असे त्यांनी म्हटले. यानंतर राणे समर्थकांकडून फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. तसेच, "उद्या जर का माझा अपघात झाला, तर याची सर्वस्वी जबाबदारी नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल, असे त्यांनी म्हटले आहे. तर नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन आज आंदोलन करणार होते. मात्र या आंदोलनाआधीच प्रकाश महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत.
प्रकाश महाजन म्हणाले की, तुमच्यात हिंमत आहे ना तर राणे साहेबांनी आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वतः यावे. मी येऊन उभा राहतो. मला घाणेरड्या शब्दात शिव्या देतात. या वयात मला माझ्या आई वरून शिव्या देतात. हेच संस्कार नारायण राणे साहेबांनी यांच्या कार्यकर्त्यांना दिलेत का? दुसऱ्याच्या नेत्याविषयी तुम्ही असभ्य भाषा वापरता आणि तुमच्या विषयी भाषा वापरल्यावर तुम्हाला राग येतो. मी 73 वर्षाचा माणूस आहे. मला आता जगण्याची काही इच्छा राहिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
























