(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmer At Abdul Sattar District : कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात एका आठवड्यात तिसरी आत्महत्या
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात एका आठवड्यात तिसरी तर जिल्ह्यात सहावी आत्महत्या झाली आहे.. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या पळसखेडा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुरज उदयसिंग शेवगण असे शेतकऱ्याचे नाव आहे. सूरज शेवगण यांची पळसखेडा शिवारात पाच एकर शेती आहे शेती करण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते सतत नापीकीला सामोरे जावे लागत असल्याने हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून शेवगण यांनी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले.. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घोषणांवर घोषणा करतंय, पण शेतकऱ्यांचं त्यावर समाधान होताना दिसत नाहीये.. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अवकाळी पावसामुळे बाधित तालुक्यांच्या यादीतून खुद्द कृषिमंत्र्यांच्याच जिल्ह्याला वगळल्याची बातमी एबीपी माझानंच दाखवली.. आता या सगळ्यावर अब्दुल सत्तार काय उत्तर देतात ते पाहावं लागेल