Chhatrapati Sambhaji Nagar : आयुक्तांचा वाढदिवस, अधिकाऱ्यांनी काढली 2.43 लाखांची वर्गणी?
संभाजीनगर शहराच्या अनेक भागांमध्ये दहा-दहा दिवस पाणी येत नाही. याच शहराचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा वाढदिवस मात्र अतिशय थाटात साजरा करण्यात आला. यासाठी मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जवळपास अडीच लाखांची वर्गणी देखील काढल्याची देखील चर्चा आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट, त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा, शानदार फेटे, सुंदर रांगोळी, जेवणासाठी उत्तम पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा असं दृश्यं काल संभाजीनगरमध्ये रंगलं होतं. वाढदिवसाचं नियोजन करण्यासाठी अधिकारी अतिशय तत्पर होते, असं कळतंय. हीच तत्परता जर शहराच्या समस्या सोडवण्यात दाखवली, तर काही महिन्यांत संभाजीनगर शहराचा चेहरामोहराच बदलून जाईल, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करतायेत.






















