एक्स्प्लोर
Balu Dhanorkar Death : शिवसेनेचा शाखाप्रमुख ते काँग्रेसचे खासदार, कसा होता बाळू धानोरकर यांचा प्रवास
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालंय.. ते 47 वर्षांचे होते. गुडगावमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजता वरोरा इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. धानोरकर यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांना पित्ताशय आणि स्वादुपिंडाचा त्रास होत होता. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांना नागपूरहून गुडगावला हलवण्यात आलं होतं.. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होेती.
आणखी पाहा























