PUNE BJP | पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, पण आपण कोल्हापूरला परत जाणार - चंद्रकांत पाटील
देशातील मूठभर शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत.जर सर्व शेतकऱ्यांना कृषी कायदा अन्यायकारक वाटला असता तर देशभर आंदोलन झाले असते. महाराष्ट्रातही काँग्रेसने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही त्यांचे कार्यकर्ते वगळता कोणीही उतरले नाहीत.पंजाबमधील शेतकऱ्यांचा गैरसमज केला जातोय. भूगाव येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचाही संदर्भ दिला. देशभरातील शेतकरी कधीच रस्त्यावर नव्हता आणि आता तो यापुढे या कायद्याविरोधात उतरणारही नाही असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.



















