Buldhana : सिंदखेडराजा भागातील पुरातन वास्तू धोक्यात? गुप्तधनाच्या शोधात कोण करतंय खोदकाम?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे ऐतिहासिक शहर. त्यात जिजाऊंचं माहेर अर्थात राजे लखोजी जाधव यांचं गाव. त्यामुळे या परिसरात अनेक पुरातन वास्तू आहेत. राजे लखोजी जाधव यांचं आडगाव राजा हे मूळ गाव याच परिसरात आहे. पण या पुरातन वास्तूंवर गुप्तधन शोधणाऱ्या टोळीची वक्रदृष्टी पडलीय. या परिसरातील पुरातन वास्तू परिसरात गुप्तधन असेल, सोने असेल या लालसेतून काही जण वस्तूंच्या आजूबाजूला रात्रीच्या वेळेस मोठे खड्डे खोदून गुप्तधन शोधत असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या केंद्रीय पुरातत्व विभागाची चिंता वाढलीय. याला कसा आवर घालायचा आणि पुरातन वास्तूंचं कसं जतन करायचं याचं मोठं आव्हान केंद्रीय पुरातत्व विभागासमोर आहे.























