Buldhana Gold - Silver Rate : बुलढाण्याच्या खामगावमध्ये सोन्याच्या भावात घट, चांदीच्या भावात तेजी
सध्या सणीसुदीचे दिवस सुरु झालेत. देशभरात सोन्याच्या किमतीत घट झाली असली तरी मात्र चांदीच्या किंमतीत वाढ झालीये. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम २०० रुपयांची घसरण झाली आहे. मात्र चांदीच्या दरात दोनशे ते अडीचशे रू प्रति किलो रुपयांची वाढ झालीये. रजतनगरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाण्याच्या खामगाव येथे चांदीचा भाव ६७,५२० रुपये प्रति किलो एवढा झालाय. तर सोने ५६,५०० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालाय. विशेष म्हणजे सरकारने सोन्याच्या अनिवार्य हॉलमार्किंग ची व्याप्ती वाढवलीये. देशातील ५५ जिल्ह्यात हॉलमार्किंग लागू करण्यात आलाय. त्यामुळे आता देशातील १६ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात हॉलमार्किंग लागू झाल आहे. त्यामुळे आगामी काळात दसरा दिवाळी हे सण असल्याने चांदीच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता चांदीचे व्यापारी वर्तवत आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
