Beed : मी बीड जिल्ह्याचा स्वभाव चांगला ओळखला म्हणून मी देशाचं राजकारण चांगल करू शकले - पंकजा मुंडे
राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे सर्व बडे नेते निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. भाजप नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. देवेंद्र फडणवीसांची गोंदियात सभा तर पंकजा मुंडेंची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बीडमधील आष्टीत पंकज मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राज्यात होऊ घातलेली नगरपंचायतीची निवडणुक काळी निवडणूक असल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर 26 जानेवारीपासून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.























