एक्स्प्लोर
Aurangabad | मनसेनं झेंड्यावर शिवमुद्रा वापरू नये; विनोद पाटील यांचा आक्षेप | ABP Majha
23 जानेवारीला म्हणजेच उद्या मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होणार आहे. त्यात मनसेच्या नव्या झेंड्याचं लोकार्पण होणार आहे. हा नवा झेंडा आणि मनसेचं निवडणुकीचं चिन्ह एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या झेंड्यावर राजमुद्रा आहे. मनसेच्या या झेंड्याचं अधिकृत लोकार्पण झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. मनसेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच अधिवेशनात मनसे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ्मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















