Aurangabad Farmer Majha Impact : शेतकऱ्यांनी अनुभवली माणुसकीची दिवाळी, माझाच्या बातमीनंतर मदतीचा ओघ
काल माझानं दाखवलेल्या एका बातमीनं महाराष्ट्र गहिवरला. राज्यभर दिवाळीचा उत्साह असताना राज्यातल्या काही भागात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. पावसानं पीक हिरावल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. औरंगाबादमधल्या शेतकऱ्याची अशी वेदनादायी कहाणी काल माझानं दाखवली आणि अनेकांचं ह्रदय हेलावलं. ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्या मुलाच्या शब्दांनी सुन्न झालेल्या दानशूर व्यक्तींनी तातडीनं या शेतकऱ्याला मदतीचा हात दिला आणि या ओलाव्यानं शेतकरी कुटुंबही आज गहिवरलं. आज माझाची टीम या शेतकऱ्याच्या घरी मदत घेऊन पोहोचली. तेव्हा ऋषिकेशच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी अनेकजण पोहोचले होते. त्यांच्या प्रेमाने चिमुकल्याचे डोळेही पाणावले. उद्धव ठाकरे यांनीही माझाच्या बातमीची दखल घेतली. उद्धव ठाकरे यांनी या चिमुरड्याशी संवाद देखील साधलाय.























