Amravati Talegaon Dashasar Shankarpat : तळेगाव दशासरमध्ये आजपासून शंकरपट ABP Majha
Amravati Talegaon Dashasar Shankarpat : तळेगाव दशासरमध्ये आजपासून शंकरपट ABP Majha
शेकडो वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील कृषक सुधार मंडळाद्वारे आयोजित शंकरपट आयोजित केल्या जाते. मागील आठ वर्षांपासून यंदा प्रथम हा शंकरपट होतोय. गावाकऱ्यांसाठी शंकरपट आणि यात्रा हा मोठा उत्सव म्हणून यावर्षी अनुभवाला मिळणार आहे.. शंकरपट पाहण्याकरिता पंचक्रोशीतून लोक येत असतात त्यामुळे येथील व्यवसायला चालना सुद्धा मिळते. या शंकरपटात सुसाट वेगाने पळणारी रिंगी वजनाने अत्यंत हलकी असते. शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूने विशिष्ट अंतरावर दोन खांब असतात आणि त्याला धागा बांधलेला असतो. पहिला धागा तोडला की घड्याळ सुरू होते, दुसरा धागा तोडला की घड्याळ बंद पडते. त्या दोन धाग्यांमधून धावतानाच्या नेमक्या वेगाची या घड्याळात नोंद होते. जी जोडी कमी वेळात अंतर कापेल ती विजयी ठरते. या शंकरपटासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बैलजोड्या आणून या स्पर्धेत खेळविल्या जातात. तळेगाव दशासर येथील प्रसिद्ध असलेला शंकरपटाला आजपासून सुरुवात होणार आहे. यात पहिल्या दिवशी दो दाणी शंकरपट, उद्या सोमवार आणि मंगळवारला एकदाणी स्पर्धेचे तसेच बुधवार १८ जानेवारीला महिलांसाठी शंकरपटचं आयोजन करण्यात आले आहे जे सर्वांसाठी मोठे आकर्षक असते.