एक्स्प्लोर
Akola Prakash Ambedkar : अकोल्यात नया साल, नया खासदार म्हणत प्रकाश आंबेडकरांचे बॅनर्स
वंचित बहुजन आघाडीने अकोला शहरात 'नया साल, नया खासदार' म्हणत प्रकाश आंबेडकरांचे बॅनर्स लावण्यात आलेत... संजय धोत्रे आजारी असल्याने भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नसताना आंबेडकरांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केल्याची चर्चा होतेये. आंबेडकरांनी सहा महिन्यापूर्वीच अकोल्यातून लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. 'इंडिया आघाडी' आणि 'मविआ' सहभागाचा तिढा सुटलेला नसतांना आंबेडकरांच्या वंचितनं अकोल्यात प्रचाराला सुरूवात केलीये. अकोला शहरातील मुख्य चौकांमध्ये आंबेडकरांचे बॅनर्स लागलेय. अकोल्यातील बॅनर लागलेल्या अशोक वाटिका चौकातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















