Raju Patil on Shinde Faction: मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला; 50 खोके घेत फुटले, गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे; राजू पाटलांचा हल्लाबोल
Raju Patil on Shinde Faction: मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला असून 50 खोके घेऊन हे फुटले, आता इतरांना खोके वाटत फिरत असल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे.

Raju Patil on Shinde Faction: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दोन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशानंतर मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटावर घणाघाती प्रहार केला आहे. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला असून 50 खोके घेऊन हे फुटले, आता इतरांना खोके वाटत फिरत असल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे.
नाही तेव्हा दुसऱ्याचं मुल मांडीवर घ्याव लागतं
राजू पाटील यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. 50 खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय? यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केलाय. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागलाय. ज्यावेळी स्वत:ला पोरगं होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मुल मांडीवर घ्याव लागतं. मिंधे गटाची हीच अवस्था आहे. आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झालेत. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय? यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केलाय. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप…
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 25, 2025
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी ज्योती राजन मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह मनसेचे उप शहराध्यक्ष किशोर कोशी, मनसे विद्यार्थी सेनेचे सुरज मराठे, रवींद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात आणि अनेक पदाधिकाऱ्यांनीही पक्षप्रवेश केला. सर्वांचा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख राजेश कदम तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
📍 ठाणे |#कल्याण #डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी सौ.ज्योती राजन मराठे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसोबत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.… pic.twitter.com/JHgf9fbuvT
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2025
इतर महत्वाच्या बातम्या
























