एक्स्प्लोर
Akola : अकोल्याच्या तेल्हारमध्ये बोगस खताच्या कारखान्याचा पर्दाफाश
अकोल्याच्या तेल्हार शहरालगतच्या खपरखेड शिवारात खताच्या बोगस कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारखान्यात चक्क माती आणि राखेपासून खत बनविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तेल्हारा येथील कृषी विभागानं ही कारवाई केलीये. या कारवाईत ८ लाख रूपये किंमतीच्या बोगस खताच्या ३० किलोच्या ५६७ बॅग जप्त करण्यात आल्यात.अकोल्यातील राहूल सरोदे याच्या मालकीच्या 'नामदेव अॅग्रो'च्या नावाखाली हा गोरखधंदा सुरू होता. या छाप्यानंतर सरोदे आणि त्याच्या साथीदारानं पळ काढला. आता या फरार आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















