Aishwarya Bachchan & Aaradhya Corona | ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण
बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.
दरम्यान आता बिग बी अमिताभ यांची प्रकृती स्थिर आहे. नानावटी हॉस्पिटलकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोविड 19 ची काहीशी लक्षणं आहेत. ते सध्या नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन यूनिटमध्ये भरती आहेत. दरम्यान सकाळी उठून त्यांनी नाश्ता केला असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे.




















