एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबई : लवकरच सिडकोच्या 15 हजार घरांची लॉटरी!
हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईत सिडकोने येत्या काळात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी बंपर लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. दसऱ्यापर्यंत सिडको 15 हजार घरांची लॉटरी काढणार आहे.
सर्वसामान्यांसाठी घरांची निमिर्ती करणाऱ्या सिडकोच्या घर बांधणीचा वेग मंदावला होता. मात्र सिडको पाच वर्षात तब्बल 52 हजार घरांची उभारणी करणार आहे. शिवाय पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरं पूर्ण करण्यात येणार असून दसऱ्यापर्यंत लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील खारघर, तळोजा, घणसोली आणि द्रोणागिरी या भागात सिडकोकडून या घरांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये तळोजा येथे सध्या 10 हजार घरांची उभारणी सुरु आहे. या वर्षा अखेरपर्यंत इमारती बांधून तयार होणार आहेत.
बिल्डरपेक्षा सिडकोकडून कमी दरात घर उपलब्घ होत असल्याने सर्वसामान्य सिडकोच्या लॉटरीची वाट पाहत असतात. त्यामुळे नवी मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दसऱ्यापर्यंत लॉटरी काढण्याचं आश्वासन सिडकोने दिलं आहे.

महाराष्ट्र
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला कसा बनला सत्ताकेंद्र?
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement