एक्स्प्लोर
मुंबई: जवानाचं प्रसंगावधान, दोन सेकंदात मुलीचा जीव वाचवला
महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं महालक्ष्मी रेल्वे स्थानकावर
एका पाच वर्षीय चिमुकलीचा जीव वाचला. ११ तारखेला संध्याकाळी ५ वाजताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
भिवंडीतील मोहम्मद दिलशान हे आपल्या कुटुंबासह हाजीअलीच्या दर्शनासाठी जात होते. ट्रेननं वेग घेतल्यानं इजरा नावाच्या त्यांच्या मुलीला यावेळी ट्रेनमध्ये चढता आलं नाही. तोल गेल्यानं मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली. याचवेळी बाजूला उभ्या असलेल्या जवान सचिन पोळ यांनी प्रसंगावधान राखत मुलीला ट्रेनपासून बाजूला ओढलं. महत्वाचं म्हणजे अगदी दीड सेकंदाच्या आत त्यांनी मुलीचा जीव वाचवला. शिवाय हे करत असताना त्यांचाही पाय निसटला... मात्र त्यांनी तात्काळ स्वतःला सावरत चिमुरडीला वाचवलं.

आणखी पाहा
Advertisement
Advertisement