Measles Disease Mumbai : मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढला, लस दिल्यानंतरही दगावताय चिमुकले
मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढतोय.. मुंबईत आतापर्यंत १५ जणांचा गोवरमुळे मृत्यू झालाय. काल वडाळा येथे राहणाऱ्या पाच महिन्याच्या मुलाचा गोवरमुळे मृत्यू झालाय. या पाच महिन्याच्या बाळाला गोवरची लस दिल्यानंतरही त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. मुंबईत गोवर बाधित रुग्णांची संख्या ३०८ वर पोहोचलीये. गेल्या २४ तासांत गोवरचे ११८ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गोवरबाधित संशयित रुग्णांची संख्या आता ४,१८० वर पोहोचलीये..तसेच, गोवर बाधित ४३ रुग्ण उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल आहेत. दिवसभरात २९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आलंय. पालिकेच्या आरोग्य पथकाने आतापर्यंत ५३ लाख ६ हजार ७८७ घरांंचं सर्वेक्षण केलंय.



















