एक्स्प्लोर
केरळ : संघाच्या कार्यकर्त्याची भररस्त्यात निर्घृण हत्या
केरळच्या त्रिसूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. के आनंद असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. २०१४ मध्ये मा.क.पा. कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप के आनंदवर होता. या प्रकरणात त्याला शिक्षाही झाली. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. त्रिसूरमध्ये आनंद बाईकवरून जात होता. तेवढ्यात एका कारने आनंदच्या बाईकला धडक दिली. त्यानंतर आनंद खाली पडला, कारमधून काही लोक खाली उतरले. या अज्ञात लोकांनी आनंदवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या के आनंदला रूग्णालयात नेले जात होते, त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला.
माकपाच्या नेत्यांनीच के आनंदची हत्या घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे.
माकपाच्या नेत्यांनीच के आनंदची हत्या घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement



















