एक्स्प्लोर

Beed Crime: वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, तरुणाला हात जोडायला लावत वाल्मिक गॅंगची दमदाटी

बीडच्या गुन्हेगारीचे वारंवार व्हायरल होणारे एक एक व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत .त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे .

Beed crime : संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड कारागृहात असला तरी शहरात वाल्मिक कराडच्या गँगची दहशत तसूभरही कमी झाली नसल्याचं चित्र आहे .  गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडच्या चेल्यांचे अघोरी कृत्य, सोशल मिडियावर  'वाल्मिक अण्णा ' च्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल होत असताना कराड समर्थकांकडून दमदाटी करत तरुणाला हात जोडत माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे .यात ' वाल्मीक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही .माझ्याकडून झाली ती चूक झाली ' असं म्हणत एक तरुण हात जोडून माफी मागताना दिसत आहे .

बीडच्या गुन्हेगारीचे वारंवार व्हायरल होणारे एक एक व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत . दमदाटी, शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, शिवीगाळ मारहाण, अघोरी कृत्य करताना व्हिडिओ करून व्हायरल केले जात आहेत . त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे .असे व्हिडिओ वारंवार समोर येत असताना  पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा आहे .

नेमकं प्रकरण काय ?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मीक कराड बीड कारागृहात आहे . वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपापासून ते शहरात वाल्मीक कराडच्या गॅंग ची दहशत महादेव मुंडे प्रकरणात होणारे गंभीर आरोप गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत . दरम्यान 'पांगरी ग्रुपवर काहीही पोस्ट करणार नाही .वाल्मीक अण्णाच्या विरोधात कुठलीही पोस्ट करणार नाही .वाल्मीक अण्णा शिवाय पर्याय नाही .माझी झाली ती चूक झाली ' असे एका तरुणाला हात जोडून म्हणायला भाग पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . दरम्यान वाल्मीक गँगने तरुणाला हात जोडण्यासाठी शिवीगाळ केलेला आहे या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे .

या व्हिडिओमध्ये दमदाटी करणारे वाल्मीक कराडचे समर्थक असल्याची माहिती आहे .नेमका हा तरुण कोण होता याबाबतची माहिती अजून मिळू शकलेली नाही .हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे तसेच या दमदाटीच्या प्रकाराबाबत संबंधित तरुणाची कुठली तक्रार नोंदवली होती का ?हे अद्याप अस्पष्ट असले तरी वाल्मिक कराड आणि त्याच्या समर्थकांच्या दहशतीचा आणखी एक प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्याने शहरात भीतीच वातावरण आहे .दरम्यान, बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होत असून वाल्मीक कराडच्या गॅंगला कोणी व कसे थोपवायचे हा सवाल कायम आहे .

 

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget