![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
कल्याणमध्ये महिलेची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की
नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टो करून नेताना वाहनचालक महिलेने महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. कल्याणच्या बैलबाजार परिसरात असलेल्या सर्वोदय मॉलजवळ हा प्रकार घडला.
चिकणघर भागात राहणाऱ्या रुबिना खान या महिलेने तिची दुचाकी मॉलबाहेर पार्क केली होती. ही गाडी टोईंग व्हॅनने अनाऊन्समेंट करून उचलली. मात्र त्याचवेळी रुबिना खानने तिथे येऊन गाडी उतरवण्याची मागणी केली.
यावरून तिने टोईंग व्हॅनवरील महिला वाहतूक पोलीस वंदना कावळे यांना धक्काबुक्कीही केली, मात्र कावळे ऐकत नसल्याचं पाहून रुबिना खानने थेट टोईंग व्हॅनमध्ये बस्तान मांडलं. जोपर्यंत माझी गाडी उतरवत नाहीत, तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही, अशी भूमिका महिलेने घेतली.
यादरम्यान टोईंग व्हॅनवरील कर्मचारी तिचं चित्रीकरण करत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने त्यांचा मोबाईलही फोडला. या सगळ्या प्रकारानंतर महिला वाहतूक पोलीस वंदना कावळे यांनी स्थानिक पोलिसांना पाचारण केलं आणि हा गोंधळ मिटला.
![Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/cde390c7a7f830066cc94a731957775a1718449628789977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Amol Mitkari : आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/c8d1abe192ad063f526aca5abf50bea01718360889792977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chhagan Bhujbal : ऑर्गनायझरची टीका खरी, उत्तर प्रदेशात काय घडलं? भुजबळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/b6be4ed1a9b7c55c45e779502d7628c81718304275405976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![T-20 Worlcup : न्यूयॉर्कच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यात काय अडचण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/510895dcb7f0ec64ed1d6a7719b724eb1718303752788976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ice cream Finger : ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये आढळला बोटाचा तुकडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/c77014f4c2c7593ea2fa047c9a3341971718303350016976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)