Prabhakar Jog : ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचं निधन ABP Majha
ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचं पुण्यातील राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त काळ संगीतक्षेत्राची सेवा केली. प्रभाकर जोग यांचं मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचं योगदान आहे. वयाच्या १२ बाराव्या वर्षी त्यांनी व्हायोलीन वादनाच्या कार्यक्रमांना सुरुवात केली होती. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केलं. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. यासोबतच त्यांनी सुधीर फडकेंना गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांत साथ दिली.






















