CoronaVirus Lockdown | प्रियांका चोप्रासह काही मराठी सेलिब्रिटीही इंग्लंडमध्ये अडकले
CoronaVirus Lockdown अर्थात नव्या कोरोना व्हायरसच्या प्रकारामुळं इंग्लंडमध्ये ओढावलेलं संकट आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळं अनेक बडे सेलिब्रिटी तिथं अडकल्याचं वृत्त आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी या बॉलिवूड सेलिब्रिटींचं परदेशात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे.
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा इंग्लंडमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. पण, रिंकू काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला माहिती दिली. याबाबत दहशतीचं वातावरण असतानाच आता कोरोना विषाणूचा नव्यानं आणखी एक प्रकार समोर आल्यामुळं या दहशतीत भर पडली आहे.























