Rajinikanth Exits Electoral Politics | सुपरस्टार रजनीकांत तूर्तास सक्रिय राजकारणापासून दूर राहणार
सुपरस्टार (rajinikanth) रजनीकांत येत्या काळात सक्रीय राजकारणात पदार्पण करणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. किंबहुना याबाबत खुद्द रजनीकांत यांनीही संकेत दिले होते. पण, हा क्षण समीप आलेला असतानाच रजनीकांत यांनी मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. हा निर्णय़ आहे तूर्तास सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा.
काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं रितसर उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून रजाही देण्यात आली. पण, येत्या काळात आपल्या तब्येतीवरच लक्ष देणार असल्याचं सांगत त्यांनी आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये आपण तूर्तास दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.























