Katrina Kaif आणि Vicky Kaushal ची लग्नानंतरची पहिली झलक
कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नानंतर आता मुंबईत परतले आहेत. दोघेही विमानतळावर स्पॉट झाले. कतरिनाने हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. भारतीय लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान विकी कौशल फॉर्मल लूकमध्ये दिसला. कतरिना आणि विकी 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर ते आज मुंबईत पोहोचले आहेत. दरम्यान विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था दिसली. विकी आणि कतरिना दोघेही आनंदी दिसत आहेत. दोघांनी लग्नापर्यंत त्यांचे प्रेम लपवून ठेवले होते. विकी आणि कतरिनाच्या लग्नसोहळ्यात एकाही बॉलिवूड कलाकाराने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे ते लवकरच एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. विकी आणि कतरिनाचे विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.





















