एक्स्प्लोर
Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन
Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक























