Kareena Kapoor Khan : प्रेग्नंसी बायबल Pregnancy Bible पुस्तकावरुन अभिनेत्री करीना कपूर वादात
वादग्रस्त प्रकरणं अभिनेत्री करीना कपूरची (Kareena Kapoor Khan) पाठ काही सोडायला तयार नाहीत... सीता सिनेमासाठी मानधन वाढवून मागितल्याप्रकरणी ट्रोल झालेली करीना कपूर आता एका पुस्तकामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेत्री करीना कपूरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केलीये. करीना कपूर आणि लेखिका आदिती शहा यांनी प्रेग्नंसी बायबल (Pregnancy Bible) नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यात बायबल शब्द वापरुन ख्रिश्चन धर्मियांच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्याचा आरोप ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या आशिष शिंदेंनी केलाय... तसंच करीना कपूर आणि प्रकाशकांनी तात्काळ समाजाची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आलीय... गुन्हा दाखल करण्याबाबत शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये अर्जही देण्यात आलाय.























