एक्स्प्लोर
Drug case | ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी अर्जुन रामपाल NCB कार्यालयात
प्रकरणात नाव गोवलं गेल्यामुळं अभिनेता अर्जुन रामपालच्या अडचणी येत्या दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधी Arjun Rampal अर्जुन चौकशीसाठी नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, अर्थात एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करत अर्जुनचं चौकशीसाठी जातानाचं छायाचित्रंही सर्वांपुढं आणलं.
ड्रग केस प्रकरणात नाव समोर आल्यामुळं अर्जुनला एनसीबीनं चौकशीसाठी बोलवल्याचं कळत आहे. यापूर्वी एनसीबीनं अर्जुनची प्रेयसी गॅब्रिएला आणि तिच्या भावाचीही चौकशी केली होती. ज्यानंतर त्याच्या पार्टनरच्या भावाला या प्रकरणात एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















