Gram Panchayat Results Kalyan : कल्याण वाहोली ग्रामपंचायतीला 20 वर्षांनंतर सरपंच
राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला आज होणार आहे.. 18 जिल्ह्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींपैकी 87 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे 1 हजार 79 जागांसाठी काल मतदान पार पडलं. याच निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे.. तसंच सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे.. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. यांत नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, कपिल पाटील यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. शिवसेनेतील दोन गटातील चिन्ह आणि नावाच्या संघर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.. निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट आणि विशेष कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात...























