एक्स्प्लोर
Neet Exam Issue : NEET च्या परीक्षेत गैरप्रकार? उत्तरपत्रिकेत रोल नंबरमध्ये खाडाखोड केल्याची तक्रार
कोल्हापूरच्या एका विद्यार्थिनीनं नीट म्हणजेच वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली आहे. आपल्या उत्तरपत्रिकेत रोल नंबरमध्ये खाडाखोड केल्याची तक्रार कोल्हापूरच्या सृष्टी पाटील या विद्यार्थिनीनं नीटकडे केली आहे. तिला नीट परीक्षेत २६ गुण मिळाले. पण संबंधित उत्तरपत्रिका आपली नसल्याचा दावा तिनं केलाय. प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नीटने याचा खुलासा करावा, अशी मागणी सृष्टीच्या वडिलांनी केलीय. या प्रकरणी नीटकडून काय स्पष्टीकरण येतंय याची प्रतीक्षा आहे.
आणखी पाहा


















