एक्स्प्लोर
Uday Samant : दोन डोसशिवाय विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाही! डोस घेतले असतील तरच सेवेतील लाभ
कॉलेजच्या समस्त विद्यार्थी आणि शिक्षक वर्गासाठी महत्त्वाची बातमी. ज्या प्राध्यापकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर त्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही, असा इशारा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलाय.
तसंच विद्यार्थांनाही दोन डोस पूर्ण केल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलंय. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ऑफलाईन परीक्षा देता येणार आहे. सध्या कोरोनाची आकडेवारी एकीकडे कमी होतेय, तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेण्याकडेही नागरिकांचा कल कमी दिसतोय. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी हा इशारा दिलाय.
आणखी पाहा


















