एक्स्प्लोर
Shakti Mill Rape प्रकरणात फाशीऐवजी जन्मठेप का दिली गेली? आयुष्यभराच्या पश्चातापासाठी जन्मठेप?
मुंबई : शक्ती मिल सामूहिक बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील तिघांना हा गुन्हा पुन्हा केल्याबद्दल मुंबई सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती तर एका आरोपीला जन्मठेप दिली होती. मात्र याप्रकरणातील पाचवा आरोपी ज्याला अल्पवयीन घोषित करून कोर्टानं या खटल्यातून वेगळं करत त्याच्यावर स्वतंत्र खटला चालवला गेला. ज्युविनाईल कायद्यानं निर्धारीत कलेली नाममात्र शिक्षा भोगून हा आरोपी कारागृहातून बाहेर पडला.
आणखी पाहा























