Special Report Akola : अकोला पोलीस कोठडीत थरकाप उडवणारा प्रकार, सराफावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार?
अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं सोने चोरी प्रकरणात शेगावातील एका सराफा व्यावसायिकाला अटक केली होती. पोलीस कोठडीत या सराफा व्यवसायिकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि उकळत्या पाण्यानं त्याचा पाय जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस शिपाई शक्ती कांबळे यांच्यावर या अमानुष 'थर्ड डिग्री'चा आरोप जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. आरोप करण्यात आलेला पोलीस अधिकारी आणि शिपायावर अद्यापपर्यंत कोणताच गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, आरोप झालेल्या दोघांचीही तडकाफडकी स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस अधिक्षकांकडे चौकशी देण्यात आली आहे.























