एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad Crime : गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात एकाच दिवशी दोन हत्या!

पिंपरी चिंचवड : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत. पहिली घटना रात्री आठच्या सुमारास घडली. यात गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधवांची हत्या झाली. पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या कोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली. काल रात्री इथं सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं. जाधव यांनी दिलेले पैसे ते परत करत नव्हते यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद शिगेला पोहोचला होता. यातूनच काल थिटे आणि सुर्यवंशीने त्यांची हत्या केली.

तिथून जाधव यांच्याच गाडीत मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने नेहली. पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरथन घाट सुरू झाला. तिथं दरीत हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथंच जवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. दुसरीकडे जाधव घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आणि आज जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला. तपासाची चक्र फिरताच थिटे आणि सूर्यवंशी पोलिसांच्या अटकेत आले. 

दुसरी घटना थोरांदळे येथे घडली. इथं द्रौपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्यावर इजा झालेल्या अवस्थेत आढळला. आदिवासी समाजाच्या द्रौपदाबाई मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पण आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात त्या सध्या वास्तव्यास होत्या. इथंच शेतात राबून उदरनिर्वाह करायच्या. काल रात्री त्यांना एक फोन आला आणि त्या घराबाहेर पडल्या. बराचवेळ त्या घरी परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता, जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेवटचा फोन कोणी केला त्याचा शोध पोलीस घेतायेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात रात्रीत दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच नागरिक सुरक्षित आहेत का? खुद्द त्यांच्या कार्यकर्त्याचीच हत्या झाल्याने असे प्रश्न आता उपस्थित केले जातायेत.

क्राईम व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Baramati Crime News: 14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Embed widget