Navi Mumbai : धक्कादायक अडीच लाख रुपयांना 10 दिवसांचं बाळ विकणाऱ्या मातेला अटक ABP Majha
धक्कादायक बातमी नवी मुंबईतून..... अवघ्या १० दिवसांच्या पोटच्या बाळाची अडीच लाख रुपयांना विक्री करणाऱ्या मातेला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय. याशिवाय हा सौदा करण्यात सहभागी झालेल्या चार दलालांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. १० दिवसांपूर्वी या महिलेनं पाचव्या अपत्याला जन्म दिला. पतीनं तिला सोडचिठ्ठी दिल्यानं पाच मुलांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न तिच्यासमोर होता. त्यातून नवजात बाळ विकण्याचा निर्णय तिनं घेतला आणि चार दलालांसह तिला प्रत्येकी ५० हजार रुपये ठरवून अडीच लाखांना सौदा ठरला. त्यानंतर नेरुळ रेल्वे स्थानकाशेजारी बाळ विकत घेण्यासाठी बोलावून पोलिसांनी आरोपी मातेसह पाच जणांना अटक केली. बाळाला भिवंडीच्या सध्या बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आलंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज


















